सीसीआय कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू …

जालना दि १०:- जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. कापूस ठेवण्यासाठी जिनींग मध्ये जागा उपलब्ध नसल्याने जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, आता कापूस ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडून आजपासून पुन्हा कापुस खरेदी केली जाणार आहे. दरम्यान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असं आवाहन देखील जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे.