सीसीआय ची कापूस खरेदी आज पासून बंद

 सीसीआय ची कापूस खरेदी आज पासून बंद

यवतमाळ दि २७ : जिल्ह्यात साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने सीसीआय ( CCI ) दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून कापूस खरेदी केंद्रे बंद करण्याची घोषणा केली आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीविना शिल्लक असून, व्यापारी कमी भावाने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तांत्रिक अडचणी आणि सीसीआय केंद्रांवर साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले आहे. हमी भावापेक्षा खासगी बाजारात दर कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकरी अद्यापही कापूस पिकाची विक्री करण्याच्या प्रतीक्षेत असल्याने खरेदीची मुदत दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. केंद्र बंद होताच खाजगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या दरात घसरण केली असून,याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *