CBSC ने तयार केली देशभरातील ५२ बोलींची अंकलिपी

 CBSC ने तयार केली देशभरातील ५२ बोलींची अंकलिपी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य राखण्यात बोलींचे स्थान महत्त्वाचे असते. या बोलींचे जतन, संवर्धन आणि रोजच्या जीवनात वापर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून देशाच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांवर आधारित अंकलिपी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उपलब्ध करून दिली आहे. यात महाराष्ट्रातील हलबी, कोरकू आणि खान्देशी बोलीचाही समावेश करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मातृभाषा आणि बोलीभाषा यांच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेचे योग्य ज्ञान मिळावे, याचा आग्रह धरण्यात आला आहे. या धोरणाला अनुसरून सीबीएसईने ५२ बोलीभाषांमध्ये अंकलिपी तयार केल्या आहेत. भाषावैविध्य जपले जावे आणि बालकांना त्यांच्या मातृभाषेची योग्य ओळख व्हावी यादृष्टीने या अंकलिपी तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अक्षरओळख आणि अंकओळख करून देण्याचे काम या अंकलिपीद्वारे होईल. ज्या भाषांमधून शाळांमध्ये शिकविले जात नाही, अशा स्थानिक भाषांची या अंकलिपीसाठी निवड करण्यात आली आहे.

फ्लिपबूक आणि पीडीएफ अशा दोन स्वरुपातील या अंकलिपी https:// ncert.nic.in/primers.php?ln=en या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या त्या प्रदेशातील शाळांनी प्राथमिक वर्गातील विद्याथ्यांना या भाषा आणि अंक शिकविताना या अंकलिपींचा उपयोग करावा, असे सीबीएसईने सुचविले आहे

SL/ML/SL

11 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *