महादेव बॅटिंग अॅप प्रकरणी सीबीआयचे दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगडपर्यंत ६० ठिकाणी छापे

 महादेव बॅटिंग अॅप प्रकरणी सीबीआयचे दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगडपर्यंत ६० ठिकाणी छापे

महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले. त्यात छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीतील ठिकाणांचा समावेश आहे. ही ठिकाणे राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महादेव बुकचा प्रमुख हस्तक, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या खासगी व्यक्तींशी संबंधित आहेत. देशभरात सट्टेबाजीच्या ॲपचे जाळे विणणारे रवी उप्पल व सौरभ चंद्राकर हे विनाअडथळा अवैध सट्टेबाजीचे नेटवर्क चालविता यावे यासाठी राजकारणी व अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच देत असल्याच्या संशयावरून सीबीआयने ही कारवाई केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *