सत्यपाल मलिकांवर CBI कडून 2200 कोटींचे आरोपपत्र दाखल

 सत्यपाल मलिकांवर CBI कडून 2200 कोटींचे आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आरोपपत्र दाखल केले आहे . हे प्रकरण सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टमधील अनियमिततेशी संबंधित आहे.

दरम्यान सत्यपाल मलिक यांनी १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सांगितले होते की, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली.

यानंतर, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या आदेशानुसार सीबीआयने एप्रिल २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला. मलिक ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *