नीट प्रकरणातील दोन आरोपींना ०६ जुलै पर्यंत सीबीआय कोठडी

 नीट प्रकरणातील दोन आरोपींना ०६ जुलै पर्यंत सीबीआय कोठडी

लातूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘नीट’पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे आज सीबीआयने या दोन्ही आरोपींना लातूर न्यायालयात उभं केल्यानंतर दोन्ही आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. ‘नीट’ घोटाळ्यातील लातूर कनेक्शनचा तपास सीबीआय कडे वर्ग केल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या सीबीआय कोठडीची मागणी सीबीआयने न्यायालयात केलेल्या युक्तीवादात केली.

लातूर पोलिसांनी या प्रकरणी पूर्वीच तपास पूर्ण केल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी दोन्ही आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
मात्र न्यायालयाने ०६ जुलै पर्यंत दोन्ही आरोपींना सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला अधिक गती आता येऊन फरार असलेला ईरंना कोनगलवार आणि दिल्ली येथील गंगाधरला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. तसेच इतरही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. CBI custody of two accused in Neet case till July 06

ML/ML/PGB
2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *