या राज्याने जाहीर केली जातनिहाय जनगणना

 या राज्याने जाहीर केली जातनिहाय जनगणना

पाटणा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारच्या नितीश कुमार सरकारनं जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं जातनिहाय जनगणना केली आहे. गांधी जयंतीचं औचित्य साधत बिहार सरकारनं ही आकडेवारी जाहीर केली आहे.बिहार सरकारमधील अप्पर मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी हा रिपोर्ट जाहीर केला आहे. या जनगणेतून अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार खूप आग्रही होते. बिहार सरकारनं एकूण २१४ जातीमधील आकडे जाहीर केली आहेत. यात अशा काही जाती आहेत त्याची लोकसंख्या ही १०० पेक्षा कमी आहे.

बिहार सरकारकडून जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीपेक्षा जास्त आहे. या रिपोर्टनुसार, बिहार राज्यात सामान्य वर्गाची लोकसंख्या १५ टक्के आहे. तर इतर मागासवर्गीयाची (ओबीसी) लोकसंख्या ६३ टक्के आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २० टक्के आहे.

SL/KA/SL

2 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *