जातपडताळणी समित्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील जातपडताळणी समित्या या भ्रष्टाचाराचं आगार झाल्या असून या समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वंकष धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सागितलं.
भाजपचे रमेशदादा पाटील पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणली जाईल त्याचप्रमाणे या समित्यांवरील अधिकारी आणि कर्मचारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी राहणार नाहीत तसंच जातपडताळणी समित्यांची संख्या वाढवण्याचाही विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
ML/KA/PGB
3 Mar. 2023