UPI वरुन करता येणार Cash Deposit

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI च्या वाढत्या वापरामुळे देशातील सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. आता UPI च्या माध्यमातून बँकेत रोख रक्कम जमा करणे शक्य होणार आहे. UPIच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख जमा करण्याची सुविधा RBI लवकरच उपलब्ध करुन देईल. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली सध्या एटीएमच्या माध्यमातून युपीआयमधून रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. कार्डलेसच्या माध्यमातून ही रक्कम काढता येते.कॅश डिपॉझिट मशीनमधअये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा आरबीआय केव्हा सुरु करणार याची माहिती दिलेली नाही. त्यांनी सध्या घोषणा केली. याविषयीची सुविधा कधी सुरु होणार, याची निश्चित तारीख गव्हर्नर यांनी दिली नाही.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वि-मासिक आर्थिक आढावा बैठकीच्या निकालांचे वर्णन करताना, शक्तीकांत दास म्हणाले की आरबीआयने युपीआयद्वारे रोख ठेवीची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सुविधेचे तपशीलवार वर्णन केले नसले तरी कॅशलेस ठेवींच्या दिशेने केंद्रीय रिझर्व्ह बँकेचा हा दुसरा मोठा प्रयत्न आहे. सध्या कॅशलेस डिपॉझिट केवळ डेबिट कार्डद्वारेच केले जात आहे.चालू आर्थिक वर्षाचा पहिला द्वि-मासिक चलनविषयक धोरण आढावा सादर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, एटीएमच्या माध्यमातून युपीआय वापरून कार्डलेस पैसे काढण्याचा अनुभव पाहता, आता UPI वापरून कॅश डिपॉझिट मशीन्स (CDMs) मध्ये पैसे जमा करण्याचीही सुविधा प्रदान करण्याच्या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे.
दास म्हणाले की, हे पाऊल ग्राहकांसाठी गोष्टी सुलभ करेल आणि बँकांमधील चलन व्यवस्थापन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करेल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार एकीकडे बँकांमध्ये कॅश डिपॉझिट मशीनचा वापर केल्याने ग्राहकांची सोय वाढली आहे. त्याचबरोबर बँक शाखांमध्ये रोख ठेवीबाबतचा दबाव कमी झाला आहे. आता युपीआयची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता लक्षात घेता, कार्डशिवाय रोख रक्कम जमा करण्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.
आरबीआय गव्हर्नर यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आरबीआय सरकारी योजनांमध्ये लोकांना थेट गुंतवणूक करता यावी यासाठी एक ॲप लाँच करणार आहे. त्यामध्यमातून सरकारी योजनांमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. सध्या आरबीआयच्या पोर्टलवर सरकारी सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक खाते उघडू शकता.
SL/ML/SL
5 April 2024