घाटकोपर दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल, व्हीजेटीआय देणार तपासणी अहवाल

 घाटकोपर दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल, व्हीजेटीआय देणार तपासणी अहवाल

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : छेडा नगर मधील जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ज्यांनी संरचना स्थिरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महानगरपालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्याच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, छेडा नगर मधील जाहिरात फलकाविषयीचा तांत्रिक तपासणी अहवाल हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेकडून सादर करण्यात येणार आहे. पाया बांधकाम किंवा संरचनात्मक स्थिरतेचा नेमका काही विषय आहे का? याबाबतचा यथायोग्य अहवाल या तज्ज्ञ संस्थेकडून सादर करण्यात येईल. त्यासाठी व्हीजेटीआय पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी सुरू केली आहे.

मुंबई शहरात कोणत्याही व्यवसायासाठी पालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपच्या बांधकामासाठी देखील प्रोव्हिजिनल (तत्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालवण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, इत्यादी बाबतची महानगरपालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.

SW/ML/SL

16 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *