निखिल वागळेंवरील हल्ल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 निखिल वागळेंवरील हल्ल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला होता.भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार फोडली होती. या प्रकरणी आता भाजपसह अजित पवार गटाच्या १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी महायुतीचे कार्यकर्ते पर्वती पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत.

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पर्वती पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेसह अजित पवार गटाचे दत्ता सागरे आणि महायुतीचे कार्यकर्ते पर्वती पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. तोडफोड प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ‘निर्भय बनो’ सभेच्या आयोजनाबद्दल एकूण २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल निखिल वागळेंच्या सभेला भाजपसह महायुतीनं विरोध केला होता. सभेसाठी निघालेल्या वागळेंच्या कारवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत तिच्या काचा फोडल्या होत्या. पुण्यातील राष्ट्र सेवा दलातील साने गुरुजी स्मारक इथं शुक्रवारी ‘निर्भय बनो’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला निखिल वागळे हे प्रमुख वक्ते होते.

SL/KA/SL

10 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *