मालवाहू जहाज वडराई समुद्रात अडकले

पालघर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघर जिल्ह्यातल्या वडराई समुद्रात मालवाहू जहाज इंजिन मध्ये बिघाड झाल्यानं बंद पडून अडकलं आहे. मुंबई पोर्ट/बंदर इथून सी सिध्दी नावाचं हे मालवाहू जहाज हाजीरा पोर्ट-गुजरात इथं जाण्यासाठी निघालं होतं. मात्र आज १ वाजताच्या दरम्यान या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं ते सातपाटी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वडराई सुमद्र जेटी पासून जवळपास 2 ते 3 नॉटीकल अंतरावर अडकून पडलं आहे त्यामुळे तिथेच नांगर टाकून ते थांबून राहिलेलं आहे. या जहाजातले इंजिनिअर हे जहाजाचं इंजिन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती डहाणू कोस्टगार्ड चे कमांडंट बी के सिंह यांनी दिली आहे. या जहाजाचं इंजिन सुरू न झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास या जहाजाच्या मदतीसाठी दुसरं जहाज मागवण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. सातपाटी पोलिसांची एक पथक या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. Cargo ship stuck in Vadrai sea
ML/KA/PGB 23 July 2023