विमानतळ कार्गो कामगारांचा भाजपात प्रवेश
मुंबई दि २९ : आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो येथील शेकडो कामगारांचा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल कामगार कर्मचारी संघ अध्यक्ष आमदार रविंद्रजी चव्हाण प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनल- २ येथील अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे महासचिव सुहास माटे, संयुक्त महासचिव योगेश अवळे, उपाध्यक्ष विनोद घोगले, महाराष्ट्र राज्य (कार्गो) सचिव चंद्रकांत धाडके, युनिट महासचिव (कार्गो) हुसेन आगा, युनिट सचिव (कार्गो) बाळासाहेब अडमाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्गो येथील पुढील कामगारांचा पक्ष प्रवेश पार पडला यामध्ये स्काय हाय युनिट – आयात विभाग भानुप्रताप जैस्वार, ओमप्रकाश गुप्ता, मोइनुद्दीन अन्सारी, बाबर शेख, फहाद शेख, शबाज शेख, प्रकाश पाल, स्काय हाय युनिट – निर्यात विभाग राजेश नेमन,दुर्गेश कनोजिया, प्रकाश भर्सिंग,दत्तात्रय करांडे, लवलेश मोर्या, अब्बास शेख, रवींद्र मराठे, राजेश ओवाळे, सिक्वेल वन सोल्युशन्स प्रा. लि. अनिल प्रसाद कनोजिया, राहुल घाडगे, रवींद्र पष्टे, विशाल शर्मा,प्रदीप यादव, हाउसकीपिंग विभाग सुनील कांबळे,मनोज जाधव, किशोर धनवे यांच्यासह शेकडो कोर्गो कमर्चा-यांचा आज भाजपामध्ये प्रवेश संपन्न झाला.ML/ML/MS