शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील करिअर संधी
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या औद्योगिक युगात विकास महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी न करता जो विकास केला जातो त्याला शाश्वत विकास म्हणतात. आजच्या जगात पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता, शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. चला त्यापैकी काहींवर एक झटकन नजर टाकूया.
1) पर्यावरण शास्त्रज्ञ (Environmental scientist):
• पर्यावरण शास्त्रज्ञ एखाद्या पर्यावरणीय समस्येविषयीचे संशोधन करून योग्य ती धोरणे विकसित करतात आणि शाश्वत विकासाला (sustainable development) प्रोत्साहन देतात. ज्यामुळे केवळ पर्यावरणाचेच नाही तर मानवी आरोग्याचेही संरक्षण केले जाते.
• पर्यावरण शास्त्रज्ञ होण्यासाठी environmental science किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी मिळवणे आवश्यक आहे जसे की Biology, Chemistry, Geography, इत्यादी. यालाच पुढे मास्टर्सशी जोड दिल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो. तुमच्या पदवी पूर्व अभ्यासक्रमात Geography, Biology, hydrology and environmental policy, इत्यादी विषयांचा समावेश असतो.
2) Environmental geologist:
• एन्व्हायरमेंटल जिओलॉजिस्ट म्हणजेच पर्यावरणीय भूगर्भशास्त्रज्ञ हा ग्रहांचा इतिहास विविध परिसंस्था आणि जैवविविधता यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करतो. मानवी क्रियाकलापांचा पृथ्वीच्या भूगर्भावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास पर्यावरणीय भूगर्भशास्त्रज्ञ करत असतात.
• या क्षेत्रात एन्ट्री-लेवल जॉब्स मिळवण्यासाठी environmental science, geology, इत्यादी क्षेत्रात बॅचलर्स पदवी आवश्यक आहे. परंतु तुम्हाला राज्य, फेडरल सरकारी संस्थां किंवा खाजगी क्षेत्रात काम करायचे असेल तर मास्टर्स डिग्री घेणे योग्य राहील.
3) लँडस्केप आर्किटेक्ट (Landscape Architecture):
• लँडस्केप आर्किटेक्ट हे वस्त्या, उद्याने, निसर्ग तसेच औद्योगिक लँडस्केपचे डिझाइन आणि व्यवस्थापन करतात.
• लँडस्केप आर्किटेक्ट या क्षेत्रात करिअर करण्यासाठीचे अंडरग्रॅज्युएट आर्किटेक्ट पदवी अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे:
– Bachelor of landscape architect or BLA.
– Bachelor of Science in Landscape Architecture or BSLA.
Career opportunities in sustainable development and environmental conservation
PGB/ML/PGB
11 Apr 2024