ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण होणार
![ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण होणार](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/05/Dnyanvapi-Shivling-Carbon-Dating.jpg)
अलाहाबाद, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदीराला लागून असलेल्या ज्ञानवापी या मशिदीमधील तलावामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. हे शिवलिंग 16 मे 2022 रोजी ज्ञानवापी कॅम्पसमधील वुजुखानामध्ये सापडले होते. वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी कार्बन डेटिंगचा अर्ज फेटाळला होता.
न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) शिवलिंगाच्या वरच्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मात्र, दहा ग्रॅमपेक्षा जास्त भाग घेतला जाऊ नये, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.
सापडलेले कथित शिवलिंग किती जुने आहे, ते प्रत्यक्षात शिवलिंग आहे की आणखी काही हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे तपासावे लागेल. या प्रकरणी एएसआयने गुरुवारी सीलबंद कव्हरमध्ये आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता.
यापूर्वी 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) विचारले होते की, शिवलिंगाला खराब न करता कार्बन डेटिंग करता येईल का? याचिकाकर्ते अधिवक्ता विष्णू शंकर जैन म्हणाले की, या तपासातून शिवलिंग नेमके कोणत्या काळातील आहे हे कळेल, परंतु अद्यापपर्यंत एएसआयने उच्च न्यायालयात कोणतेही उत्तर दाखल केलेले नाही.
यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने एएसआयला उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी दिली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने एएसआयला विचारले की, कार्बन डेटिंगची चाचणी हानी न करता करता येते का? आता या प्रकरणात शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.
SL/KA/SL
12 May 2023