विद्यार्थीनींनी साकारले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग वापर मीटर

अकोला, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजचा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असून इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग करण्यासाठी नेमका कोती विजेचा किती वापर होतो याची कुठलीही माहिती मिळत नाही मात्र यावर अकोल्यातील पूर्वा जामनिक आणि समीक्षा टिकार या विद्यार्थिनींनी उपाय शोधत थेट स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जर वापर मीटरची निर्मिती केली असून या प्रयोगाला केंद्र सरकारच्या विज्ञान , तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इन्स्पायर मानक पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारात मिळालेली दहा हजार रुपयांची रक्कम प्रयोगाला अधिक चांगले करण्यासाठी केंद्र सरकारने दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेने भारत देशामध्ये सध्या चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत. चार्जिंग वरील मोटरसायकल सरासरी 80 किलोमीटर प्रवास करते तर इलेक्ट्रिक कार ही दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. मग त्यानंतर काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग करण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंट किंवा कुणाच्या घरी चार्ज करण्यासाठी प्रयत्न केला असता नागरिक किंवा हॉटेल चालक आपल्या विजेचा वापर होईल आणि त्यासाठी परतावा मिळणार नाही या कारणाने चार्जिंग करण्यास नकार दर्शवतात. यावर उपाय म्हणून अकोल्यातील चिमणलाल भरतीया विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी उपाय शोधून काढला असून विद्यार्थिनींनी स्मार्ट वेहिकल चार्जरची निर्मिती केली आहे.
या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेईकल कुठेही चार्ज करायचे असल्यास एक छोटेसे मीटर सोबत ठेवल्यास चार्जिंग करण्यासाठी नेमका किती युनिट विजेचा वापर झाला हे त्वरित करणार असून यामुळे ज्यांच्याकडे गाडी चार्ज केली त्यांना युनिट प्रमाणे मोबदला देणे शक्य होणार आहे. त्यामुळे या प्रयोगाचे सर्व कौतुक स्वागत होत. आजचा इलेक्ट्रिक वाहनांचा काळ पाहता अत्यंत कमी खर्चामध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल मीटरची निर्मिती करून विद्यार्थिनींनी जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञानाचा दिलेला नारा प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणार हे निश्चित.
ML/KA/PGB 6 Feb 2024