एक्सप्रेस हायवेवर गाडीने घेतला पेट, चार ठार

 एक्सप्रेस हायवेवर गाडीने घेतला पेट, चार ठार

पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील खंडाळा घाटात मिथाईल केमीकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला आणि टँकरने जागीच पेट घेतला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

काही वेळापूर्वी पाऊस आल्याने टँकरची आग आटोक्यात आली होती मात्र पुन्हा या आगीचा भडका उडाला. दोन तासांपासून आग धुमसत होती.
खंडाळा जवळ तीव्र उतार आहे. भरधाव वेगात हा ऑईलचा टँकर जात होता. त्यावेळी या टँकरचा ताबा सुटला. त्यानंतर टँकरमधील ऑईल महामार्गावर असलेल्या होर्डिंगवर पडलं. टँकर कठड्याला जाऊन धडकला आणि पलटी झाला. त्यानंतर या टँकरमध्ये असलेल्या ऑईलने लगेच पेट घेतला.Car caught fire on express highway, four killed

हा अपघात साधारण बाराच्या सुमारात झाला. या टँकरमध्ये मिथाईल केमीकल होतं. त्यामुळे टँकरने अचानक पेट घेतला. ब्रिजच्या खाली गावातील प्रवासी होते. लागलेल्या आगीचा गोळा त्यांच्या अंगावर पडला त्यामुळे दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय

ब्रिजवरील ऑईल टँकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खालीदेखील या आगीच्या झळा पोहचल्या. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते तीन गाड्यांना देखील आग लागली. ऑईल टँकरला आग लागल्याने पुन्हा स्फोट झाला. असं असलं तरी मागील तासाभरापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली असून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायंकाळी चारच्या सुमारास पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यात येत होती. मात्र आग धुमसत असल्याने आणि भडकल्याची भीती असल्याने मुंबई दिशेने येणारी वाहतूक आणि पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा घेण्यात आला होता. पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर केमिकल टँकरला आग लागल्यानं अनेक प्रवासी तीन तासंपासून ताटकळले होते.

ML/KA/PGB
13 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *