दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार

 दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार

नवी दिल्ली,दि. ६ : दिल्ली विधानसभा परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 वाजण्याच्या सुमारास, पांढऱ्या रंगाची टाटा सिएरा कार मॉल रोडकडील बंद गेटवर धडक देत व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत शिरली. प्रत्यक्षात, या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरियर्स असतानाही वाहनाने लोखंडी अडथळा तोडत आत प्रवेश केला. कार चालकाने मुखवटा घातला होता. अधिकाऱ्यांच्या मते, चालक थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाकडे गेला आणि पोर्चजवळ पुष्पगुच्छ ठेवून कारसह घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कारचा शोध सुरू आहे. गेट नंबर 2 वर आता सीआरपीएफ (CRPF) तैनात करण्यात आले आहे. अलीकडेच विधानसभेला बॉम्बने उडवण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या.

यानंतर संपूर्ण विधानसभा परिसरात तातडीने सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, परिसर सील करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनाचा आणि चालकाचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी ठेवलेल्या पुष्पगुच्छाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. तरीदेखील, या संपूर्ण प्रकाराकडे संभाव्य सुरक्षा भंग म्हणूनच पाहिले जात असून, तपास यंत्रणा कोणतीही शक्यता नाकारत नाहीत. विशेष म्हणजे, व्हीआयपी गेटवर CRPF आणि इतर सुरक्षा दल तैनात असतानाही वाहनाने आत प्रवेश कसा केला, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे विधानसभा परिसरातील सुरक्षा प्रोटोकॉल आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *