भार्गवी म्हात्रे किशोरी उपनगर कबड्डी संघाची कर्णधार …

ठाणे दि २२– २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ मनमाड नाशिक येथे ३५ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी किशोरी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघामध्ये बालयोगी सदानंद बाबा कबड्डी , राई , भाईंदर संघाच्या भार्गवी म्हात्रे, मनस्वी पठारे आणि संस्कृती पाटील याची निवड झाली आहे , यापैकी भार्गवी म्हात्रेची निवड संघाची कर्णधार म्हणून झाली आहे.
मुलांच्या संघात प्रसाद तांबे याची निवड झाली आहे. बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघाच्या मुलाना सदानंद पाटील, फायर ऑफिसर , मीरा भाईंदर हे प्रशिक्षण देतात या सगळ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे .
भार्गवी म्हात्रे हिची आपल्या सुंदर कलात्मक चढाईच्या जोरावर सलग तीन वर्ष किशोरी मुंबई उपनगर संघामध्ये निवड होत आहे, तसेच या वर्षी कुमारी महिला मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघामध्ये ही तिची निवड झाली होती. भगवी म्हात्रे राई, मनस्वी पठारे मूर्धा आणि संस्कृती पाटील मोर्वा या गावातील खेळाडू असून त्या बालयोगी सदानंद बाबा संकुल राई येथे सदानंद पाटील मीरा भाईंदर फायर ऑफिसर यांच्या कडून गेल्या ५ वर्षा पासून प्रशिक्षण घेतात.