कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी

 कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी

कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अर्ज दाखल करण्यासाठी आलेले काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी रयत शाहू महाराजांच्या पाठिशी आहे. कोण काय बोलतं
याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांना उत्तर द्यायला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता तयार आहे. ही वैचारिक लढाई आहे, असं सांगत विधिमंडळ काँग्रेस पक्ष गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

लोकांच्या मनात जे होते ते आज घडत आहे. लोकांना बदल हवा आहे. लोकांना शाहूंची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे आहेत. मतदारसंघात लोकांचा उत्साह आहे. लोकं बदल घडविल्या शिवाय राहणार नाहीत. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित काम करत आहेत. विचारांवर या लढाईला सामोरं जाणार असल्याचं माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

ML/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *