कर्करोग उपचारांसाठी राज्यात तीन स्तरावर रुग्णालये

 कर्करोग उपचारांसाठी राज्यात तीन स्तरावर रुग्णालये

मुंबई दि २४ : राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोग निदान आणि उपचारांसाठी तीन टप्प्यात रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत आहे, त्यासाठी शासनाचा निर्णय झाला असून निधीची तरतूदही करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती त्यावर अमीन पटेल, सुलभा खोडके आदींनी उपप्रश्न विचारले होते.

या तीन टप्प्यातील रुग्णालयांची उभारणी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात एक, दुसऱ्या टप्प्यात सात आणि नंतर तिसऱ्या टप्प्यात ही रुग्णालये उभारण्यात येणार आहेत अशी माहितीही आबिटकर यांनी दिली. वय वर्ष 9 ते 13 या वयोगटातील मुलींसाठी कर्करोग लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे असं ते म्हणाले. राज्यात रेडिओथेरपी साठी पहिल्या टप्प्यात आठ केंद्र आणि दुसऱ्या टप्प्यात 26 केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कर्करोग निदानासाठी आवश्यक असणाऱ्या पेट स्कॅन चा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत केला जाईल अशी ग्वाही आबिटकर यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *