केम्ब्रिज डिक्शनरीने बदलली ‘महिला’ शब्दाची व्याख्या
मुंबई,दिय 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळानुरुप भाषेतील शब्दांचे संदर्भ आणि व्याख्या बदलत असतात. भाषा प्रवाही राहण्यासाठी आणि ती जनसामान्यांना आपलीशी वाटावी म्हणून शब्कादकोश काळानुरुप अद्ययावत ठेवले जातात. गेल्या काही दशकांपासून जगभरात सुरू असलेल्या लिंग परिवर्तनाच्या घटना लक्षात घेता. महिली आणि पुरुष या लिंगांचा अर्थ अधिक व्यापक करण्याची गरज लक्षात घेऊन जगप्रसिद्ध केब्रिज डिस्शनरीने या शब्दांच्या व्याख्या आता अद्ययावत केल्या आहेत.
केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये ‘महिला’ या शब्दाबाबत एक नवीन अपडेट करण्यात आले आहे. या अपडेटमध्ये ‘महिला’ या शब्दाच्या व्याख्येत बदल करण्यात आला आहे. नव्या व्याख्येनुसार ‘अशी कोणतीही व्यक्ती जी स्वतःची ओळख स्त्री म्हणून करते, त्या व्यक्तीला महिला असे संबोधता येईल. त्या व्यक्तीचे लिंग जन्माच्या वेळी कोणते होते याची दखल यात घेतली जाणार नाही.’
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ‘महिला’ शब्दाची अतिरिक्त व्याख्या ऑनलाईन डिक्शनरीमध्ये जोडण्यात आली आहे. ज्यामध्ये तृतीयपंथींचा समावेश करण्यात आला आहे. ‘महिला’ या शब्दासाठी ‘मनुष्य प्रजातीतील प्रौढ स्त्री’ यासह ‘इतर लिंगामध्ये जन्म झाला असला तरी एखादी प्रौढ व्यक्ती स्वतःची ओळख स्त्री म्हणून करत असेल आणि त्याप्रमाणे जीवन जगत असेल तर ती व्यक्ती महिला आहे’ ही व्याख्या जोडण्यात आली आहे.
14 Dec. 2022