कंबोडियाने थायलंडसोबत केली युद्धबंदीची घोषणा

बँकॉक, दि. २८ : कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी थायलंडसोबत सुरू असलेल्या सीमा वादात युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी लढाई तात्काळ थांबवण्याची अपेक्षा आहे. या युद्धबंदीमध्ये चीन आणि अमेरिकेने मध्यस्थी केली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आज दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली.
थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट या बैठकीत सहभागी होतील. मलेशिया या बैठकीचे अध्यक्षस्थान करेल. दोन्ही देशांमधील सीमा वादामुळे गेल्या काही दिवसांपासून जोरदार गोळीबार सुरू आहे. यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक नागरिकांचा समावेश आहेत.
मलेशिया सध्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचे (ASEAN) अध्यक्षपद भूषवत आहे. त्यांनी दोन्ही देशांना वाटाघाटीच्या टेबलावर बोलावले आहे.