लवकरच बंद होणार कॉल फॉरवर्डिंग सुविधा

 लवकरच बंद होणार कॉल फॉरवर्डिंग सुविधा

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : USSD आधारित सेवा अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. यामध्ये कॉल फॉरवर्डिंगची सुविधा देखील समाविष्ट असते मात्र आता ही सेवा बंद होणार आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने याबाबत सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिली आहे. यामध्ये 15 एप्रिलपासून ही सुविधा बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सांगितले आहे की ते ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंग सुविधा पुन्हा सक्रिय करण्याचा पर्याय देऊ शकतात. ज्या ग्राहकांनी सध्या त्यांच्या फोनमध्ये USSD कॉल फॉरवर्डिंग सुविधा सक्रिय केली आहे त्यांना 15 एप्रिलनंतर सेवा पुन्हा सक्रिय करण्यास कंपन्या सांगतील. यासाठी ग्राहकांना USSD व्यतिरिक्त इतर पर्याय दिले जातील. ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय कॉल फॉरवर्डिंग सुविधा सक्रिय होणार नाही याची खात्री करण्यास कंपन्यांना सांगण्यात आले आहे.दूरसंचार विभागाची ही सूचना USSD वर आधारित कॉल फॉरवर्डिंगसाठी आहे. विभागाने दूरसंचार कंपन्यांना 15 एप्रिलपासून USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यास सांगितले आहे. तसेच, सरकारने कंपन्यांना कॉल फॉरवर्डिंगच्या सुविधेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये USSD सेवांचा गैरवापर होत असल्याची भीती सरकारला वाटते. यामुळे सरकारने 15 एप्रिलपासून USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्यास सांगितले आहे. अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटावर आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा म्हणजेच USSD ला *401# सेवा देखील म्हणतात.

SL/ML/SL

31 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *