BYJU’S च्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी एज्युटेक कंपनी BYJU’S चे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अजय गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो सहा महिन्यांपूर्वीच कंपनीत रुजू झाले होते. आता ते पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या वेदांता कंपनीत परतणार आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ऑडिट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गोयल यांनी राजीनामा दिला आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज प्रदीप कनाकिया यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक (वित्त) नितीन गोलानी यांना पदोन्नती देऊन कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून कंपनीचे वित्त कार्य हाताळण्यासाठी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.कनाकिया यांना 35 वर्षांचा उद्योगाचा अनुभव आहे, त्यांनी प्राइस वॉटरहाऊस आणि केपीएमजी येथे नेतृत्वाची पदे भूषवली आहेत, तर गोलानी पूर्वी आकाश एज्युकेशनमध्ये मुख्य धोरण अधिकारी होते.

BYJU’S कंपनी 2022-23 या आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर करू शकलेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एप्रिलमध्ये कंपनीच्या जागेवर छापे टाकले होते. ईडीने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या तरतुदींनुसार कारवाई केली होती.

SL/KA/SL

24 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *