भायखळ्यावासियांना मिळणार नवीन उद्यान

 भायखळ्यावासियांना मिळणार नवीन उद्यान

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा भायखळा प्रभाग क्रमांक २११ मध्ये तब्बल ७०० चौरस मीटरचे उद्यान साकारण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८४ लाख ३० हजार ३४९ रुपये खर्चणार आहे. Byculla residents will get a new park

विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येत आहे. भायखळा भारतरत्न मौलाना आझाद मार्ग येथील प्रभाग क्रमांक २११ येथे सीएस क्रमांक १५७८२१ / १५७८ आरजी प्लाट आहे. या प्लाटचा विकास करण्यात येणार असून या प्लाटवर उद्यान विकसीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ७०० चौरस मीटर जागा असून या जागेवर साकारण्यात येणाऱ्या उद्यानात जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन सुविधा, बसण्यासाठी बेंच उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भारतरत्न मौलाना आझाद मार्गावर असलेला हा प्लाॅट विकास नियोजन आराखड्यात आरक्षित मैदान आहे. परंतु या ठिकाणी उद्यान बनवण्यात यावे, अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांकडून सतत होत होती. अखेर आरक्षित असलेल्या या भूखंडावर उद्यान साकारण्यात येणार असून यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ML/KA/PGB
20 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *