भायखळा पूर्व येथील फेरबंदर भागात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा
मुंबई, 15
भायखळा पूर्व येथील फेरबंदर येथे नागरिकांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. फेरबंदर येथे मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि मनसे यामध्ये कोण विजयी होणार यासाठी जोरदार चर्चा सुरू असून त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळीच बाहेर पडून मतदान केले. या विभागामध्ये अनेक चाळी रीडेव्हलपमेंटमध्ये गेले असल्यामुळे अनेक नागरिक पनवेल,उलवे,नवी मुंबई, विरार या ठिकाणी राहायला गेले आहेत. परंतु ते सुद्धा सकाळी लवकर येऊन या ठिकाणी मतदानाच्या लाईनीमध्ये उभे होते. मतदान करणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी आम्ही उलवे या ठिकाणावरून येथे आलो आहोत. आमची चारी डेव्हलपमेंट मध्ये गेल्यामुळे आम्हाला मुंबईमधील भाडे परवडत नसल्याने आम्ही उजव्या या ठिकाणी राहायला गेलो आहे. परंतु आपल्या परिसराचा विकास व्हावा आणि आम्हाला चांगला नगरसेवक मेळावा यासाठी आम्ही सकाळीच या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो असल्याची माहिती रवींद्र माने या मतदाराने दिली.KK/ML/MS