भायखळा येथे पार पडला विविध नगरी कामांचा शुभारंभ
मुंबई, दि १४
भायखळा येथील जुन्या मलनिःसारण वाहिन्या अतिशय खराब झाल्या होत्या. त्यांची दुरूस्ती करण्याची फार गरज होती . त्या अनुषंगाने आमदार मनोज जामसुतकर यांच्या आमदार निधीतून राम नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील मलनि:सारण वाहिन्यांची चेंबरसहित दुरुस्ती कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे काम हाती घेण्यात आले असून, यामुळे परिसरातील सांडपाणी वाहिनी तुंबणे, अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे. त्यामुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल अशी माहिती आमदार मनोज जामसुतकर यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक मंगेश बनसोड,उपविभागप्रमुख राम सावंत,सहसंघटक हेमंत कदम,शाखा प्रमुख काका चव्हाण,महिला शाखा संघटिका सौ प्रियांका टेमकर,शाखा समन्वयक रमेश चेंदवनकर,जेष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS