भायखळा येथे शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि 22
शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा येथे शिवसेनेचे सक्रिय सदस्यता नोंदणी अभियान नुकतेच सुरु झाले. या सदस्य नोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार यामिनी जाधव यांनी नोंदणी अर्ज भरून या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी शिवसैनिकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. शिवसेना नेहमीच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने कार्य करत असते. शिवसेनेची नाळ ही तळागाळातील जनतेसोबत जोडलेली आहे. शिवसेना आणि मराठी माणूस यांचे एक घट्ट नाते आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याची माहिती माजी आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली. यावेळी भायखळा शिवसेनेतील सहकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS