भायखळा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती जल्लोषात
मुंबई, दि २३
श्री संत गाडगे महाराज 150 व्या जयंतीनिमित्त श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
यंदाचे वर्ष श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्षी असल्यामुळे बाबांच्या जयंती निमित्त शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये बाबांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे, विदर्भ समाज संघ व विदर्भ वैभव मंदिर आणि गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी सुद्धा श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे बाबांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर रितू तावडे व विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार विदर्भ वैभव मंदिर चे अध्यक्ष अशोकराव बारब्दे ,कार्यकारी विश्वस्त गजानन नागे सरचिटणीस उत्तमराव लोणाकर निमंत्रक प्रभाकर आडेकर तसेच या कार्यक्रमाला कामा हॉस्पिटलच्या डिन राजश्री कटके उपस्थित होत्या बाबांच्या जयंतीनिमित्त महापौर रितू ताई तावडे यांनी बाबाच्या प्रतिमेला हार घालून पूजन केले त्यानंतर गाडगेबाबांच्या जीवनावर एकांकिका नाटक या ठिकाणी सादर करण्यात आले, या ठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लॅंकेट वाटप व प्रसाद महाप्रसाद वाटप या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते गाडगे महाराज धर्म शाळेचे विश्वस्त एकनाथ भाऊ ठाकूर व व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर अनेक विविध कार्यक्रम आपल्याला मुंबईमध्ये केले जाणार आहे असे संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच मुंबईच्या महापौरांनी श्री संत गाडगे महाराज यांचे शेवटचे भाषण वांद्रे पोलीस स्टेशन पश्चिम या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी बाबाचा भव्य स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात यावं तसेच गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे पूर्वीचे हे नाव महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगरपालिकेने दिले होते सदर नाव पुन्हा देण्यात यावे महापौरांना विनंती केली, स्वच्छता अभियानाचे नाव श्री संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान असेच राहावे, तसेच श्री संत गाडगे महाराज यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सरकारने भारत सरकारने जाहीर करावा अशी विनंती गजानन नागे यांनी केली , गाडगेबाबाच्या जन्मगाव येथे बाबांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा मनोदय विदर्भ समाज संघ चे गजानन नागे व विदर्भ वैभव मंदिर चे अध्यक्ष श्री अशोकराव बारब्दे यांनी आपल्या भाषणात केले महापौर मॅडम तावडे यांनी गाडगे बाबाच्या संदेशाप्रमाणे मुंबई महापालिकेत काम केल्या जाईल स्वच्छतेवर भर दिला जाईल, रुग्णालयात गोरगरिबांना कशी मदत करता येईल त्यावर भर दिला जाईल शिक्षणासाठी कशी मदत करता येईल त्यावर भर दिला जाईल अनेक गाडगेबाबांच्या नावे उपक्रम मुंबई महापालिकेत राबवण्याचा मनोदय त्यांनी या वेळेस व्यक्त केला आणि आपल्या गाडगेबाबांच्या या 150 वर्षानिमित्त गाडगेबाबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा मनोदय महापौर पश्रीमती रितू तावडे यांनी आपल्या भाषणात सांगितला या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा व विदर्भ समाज संघ मुंबई व विदर्भ मंदिर मुंबई या संस्थेच्या वतीने सहकार्य व मेहनत करण्यात आली त्यानंतर गाडगेबाबांची प्रार्थना व पसायदान नाणे कार्यक्रम संपला.KK/ML/MS