राज्यातील या दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोडनिवडणूका जाहीर
मुंबई,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. झाला. पुणे जिल्ह्यातील कसबापेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. Maharashtra assembly bypoll Election 2023
या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.
SL/KA/SL
18 Jan. 2023