कडधान्याची खरेदी 15 ऑक्टोबर पासून….

सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन, उडीद व मुग या कडधान्याची 15 ऑक्टोबर पासून हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे. दोन हमीभाव केंद्राची त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून नाफेड मार्फत ही खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते उडीद मूग यासारख्या कडधान्याला खुल्या बाजारात पुरेसा दर मिळत नाही शेतकरी हमीभाव केंद्राची वाट पाहत आहेत ते सुरू झाल्यास हमीभावाने विक्री होईल अशी अपेक्षा आहे.
ML/ML/PGB
10 Oct 2024