बटरनट स्क्वाशची भाजी

 बटरनट स्क्वाशची भाजी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बटरनट स्क्वाश आधीच शिजल्यामुळे भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. ही भाजी चुकून जास्त तिखट झाली तर जेवताना भाजीत थोडे दही घालूनही खाता येते.

बटरनट स्क्वाश – अर्धा
तेल
मोहरी- १ चमचा
जिरे- १ चमचा
मेथादाणे- १ चमचा
हिरवी मिर्ची
लसूण
कडीपत्ता
हळद
हिंग
मीठ
कोथिंबीर

बटरनट स्क्वाश कापून, साल काढून इंचभर मापाचे तुकडे करून घेतले. २-३ चमचे तेल लावून एअर फ्रायर मधे ३५० फॅ.ला १० मि. भाजून घ्यावे. नाहीतर पॅनमधे थोडे शिजेपर्यंत परतून घेता येतील.

कढईत फोडणीसाठी तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालावे.
जिरे फुलल्यावर त्यात मेथीदाणे घालावे.
मेथीने रंग बदलायला सुरू केल्यावर त्यात बारिक चिरलेली मिर्ची, लसूण आणि कडीपत्ता घालावा.
ते नीट भाजल्यावर त्यात हळद, हिंग घालावे. मग त्यात बटरनट स्क्वाश घालून चवीनुसार मीठ घालावे. सगळे नीट मिसळल्यावर झाकून दणदणीत वाफ काढावी. वरून कोथिंबीर घालून सजवावी. भाजी तयार!

ML/KA/PGB
8 Dec 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *