बस खोल दरीत कोसळली, सात मृत्यू , २९ प्रवासी जखमी
खोपोली, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील जुना मुंबई – पुणे मार्गावर खोपोली येथे भीषण अपघात झाला असून त्यात
जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये ४५ प्रवाशी असून, यातील १३ प्रवासी मयत झाल्याचे आणि २९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातानंतर दरीमध्ये उतरून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आले आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तर घटनास्थळावर अपघातग्रस्ताच्या मदतीला, हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम बचाव कार्य करत आहेत.
अपघात मोठा असून, रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
या अपघातग्रस्त बसमध्ये बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे.
पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे परतत असताना हा अपघात झाला आहे.
जखमी रूग्णांना डॉ बाबासाहेब आंबेडकर खोपोली रुग्णालयात दाखल तर बाकी पनवेल कामोठे येथील एम जी एम या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
SL/KA/SL
15 April 2023