सप्तशृंगी घाटात बस कोसळली, एक मृत्यू तर 18 प्रवासी जखमी…

 सप्तशृंगी घाटात बस कोसळली, एक मृत्यू तर 18 प्रवासी जखमी…

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड ते नांदुरी दरम्यान ST बस आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान घाटातून दरीत कोसळली, खामगाव डेपोची वणी येथे मुक्कामी असणारी बस क्र .MH40 AQ 6259 ही बस असून बसमध्ये 20 ते 22 होते, यात एका महिलेचा यात मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत, सुदैवाने बस पलटी झाली नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले आहेत. Bus crashes in Saptshringi ghat, one dead and 18 injured

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघात स्थळाकडे रवाना झाले आहेत.

ML/KA/PGB
12 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *