अंबड बसस्थानकात बस अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

जालना दि २२:– जालन्याच्या अंबड बसस्थानकात बस अनियंत्रित होऊन फलाटावर चढल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 ते 8 प्रवासी जखमी झालेत. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. अंबड बस स्थानकात अंबड – सिल्लोड ही बस (क्र. एम एच 20बी एल 1606) अनियंत्रित होऊन बस स्थानकातील फलाट क्र. 4 वर चढली यात बसने 8 ते 10 प्रवाशांना धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत. मुरलीधर काळे (वय 60 वर्ष रा. शेवगाव ता. अंबड जि. जालना) आणि खालील उल्ला अजीम उला शेख (वय 75 वर्ष रा. जुना जालना) अशी मयत दोघांची नाव आहेत. तर पारूबाई नवघरे वय 40 वर्ष, हिना अलीम शेख वय 26 वर्ष, रेहान शेख आणि आयान शेख वय दीड ते 2 वर्ष अशी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या प्रवाशांची नाव आहेत. दरम्यान, सर्व जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.