जसप्रीत बुमराह पुन्हा अनफिट ?
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन एक दिवसीय क्रिकेट मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याला वगळण्यात आले आहे. 3 जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला होता . या निर्णयानंतर, अवघ्या 6 दिवसात जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याच सांगण्यात आल आहे. उद्या गुवाहाटी येथे भारत-श्रीलंका वन डे सिरिज मधील पहिला सामना होणार आहे.
जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. पाठिच्या दुखण्यामुळे तो वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. त्याला फिट घोषित करण्यात आलं. एनसीएने फिट घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला. पण आता अचानक बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराहचा फिटनेस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्याशिवाय वनडे वर्ल्ड कपमध्येही खेळणार आहे. टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळेच BCCI बुमराहला खेळवण्याची घाई करत नाही असे दिसून येत आहे.
SL/KA/SL
9 Jan. 2023