बुमराहला ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार

 बुमराहला ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या डिसेंबरमधील कामगिरीसाठी ICC प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डॅन पॅटरसन आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचेही नामांकन केले होते. महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला हा पुरस्कार मिळाला. भारताची स्मृती मंधाना आणि दक्षिण आफ्रिकेची ॲन मलाबा याही शर्यतीत होत्या.

जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एखाद्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एकामागून एक विकेट्स घेत संघाला वारंवार सामन्यात परत आणले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील या उत्कृष्ट कामगिरीचं बुमराहला आयसीसीकडून पारितोषिक मिळालं आहे.

जसप्रीत बुमराहने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४ चा पुरस्कार पटकावला आहे. बुमराहने पॅट कमिन्स आणि डेन पॅटरसनला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. बुमराहने डिसेंबरमध्ये खेळवल्या गेलेल्या ३ कसोटींमध्ये १४.२२ च्या प्रभावी सरासरीने सर्वाधिक २२ विकेट्स घेतले आणि एकट्याने भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्त्व केले. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडची डिसेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

SL/ML/SL

14 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *