राज्यात प्रवासी वाहनांची बंपर विक्री
मुंबई, दि. १९ : GST कपातीनंतर वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत महाराष्ट्राने सर्वाधिक प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री केली. या कालावधीत दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या श्रेणीत उत्तर प्रदेश अव्वल आहे. ही माहिती उद्योग संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीवर आधारित आहे. आकडेवारीनुसार, दुसऱ्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत (२०२५-२६) देशात १०.३९ लाख प्रवासी वाहने विकली गेली. त्यापैकी पश्चिम भागात सर्वाधिक ३.४४ लाख युनिट्स विकले गेले.
राज्यनिहाय गाड्या विक्री
प्रवासी वाहन विभागात महाराष्ट्राने १३१,८२२ युनिट्स विकल्या, जे एकूण १२.७ टक्के आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यातील विक्री १००,४८१ युनिट्स आहे. हा आकडा एकूण विक्रीच्या ९.७ टक्के आहे. ८७,९०१ वाहनांच्या विक्रीसह गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातचा वाटा ८.५ टक्के आहे. आकडेवारीनुसार, कर्नाटक ७६,४२२ युनिट्स (७.४ टक्के) सह चौथ्या क्रमांकावर आहे आणि केरळ ६९,६०९ युनिट्स (६.७ टक्के) सह पाचव्या क्रमांकावर आहे.
SL/ML/SL