बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी या मार्गावर भुयारी सुरुंगाचा ब्रेक थ्रू पूर्ण

 बुलेट  ट्रेन प्रकल्पासाठी या मार्गावर भुयारी सुरुंगाचा ब्रेक थ्रू पूर्ण

मुंबई, दि. २० :

नवी मुंबईजवळील घनसोली आणि शिलफाटा दरम्यान भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 4.881 किलोमीटर लांब भुयारी सुरंगाचा ब्रेकथ्रू नुकताच पूर्ण झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक टप्प्याची घोषणा करण्यात आली. ही सुरंग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) तंत्रज्ञानाने बांधली गेली असून ती 21 किलोमीटर लांब समुद्री सुरंगाचा भाग आहे, जी मुंबईतील बीकेसीपासून शिलफाटा पर्यंत पसरलेली आहे. या सुरंगाचा सुमारे 7 किलोमीटर भाग ठाणे क्रीकखालील समुद्रातून जाणार आहे.या ब्रेकथ्रूच्या वेळी मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, “ही सुरंग प्रकल्पाच्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी आहे. 4.9 किलोमीटरचा ब्रेकथ्रू म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.” त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील पूर्वीच्या ठाकरे सरकारच्या काळात प्रकल्पाला मिळालेल्या अडथळ्यांचा उल्लेख केला आणि सध्याच्या राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे कामाला गती मिळत असल्याचे सांगितले.बुलेट ट्रेन सेवा 2027 मध्ये पहिल्या टप्प्यात सुरू होणार असून, 2028 मध्ये ती ठाणेपर्यंत आणि 2029 मध्ये मुंबईपर्यंत पोहोचेल. प्रवाशांना पिक आवरमध्ये दर 30 मिनिटांनी सेवा मिळेल आणि आरक्षणाची गरज नसेल — प्रवासी थेट तिकीट घेऊन प्रवास करू शकतील. भाडे सामान्य नागरिकांच्या बजेटमध्ये राहील, असेही मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले.सध्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या 508 किलोमीटरपैकी 321 किलोमीटर वायाडक्ट आणि 398 किलोमीटर पियरचे काम पूर्ण झाले आहे. 17 नदी पूल आणि 9 स्टील ब्रिज तयार झाले आहेत. 206 किलोमीटर मार्गावर 4 लाखांहून अधिक नॉइज बॅरियर्स बसवण्यात आले आहेत. गुजरातमधील सर्व स्टेशनवर अधिरचना काम अंतिम टप्प्यात आहे, तर मुंबई भूमिगत स्टेशनवर बेस स्लॅब कास्टिंगचे काम वेगाने सुरू आहे.या प्रकल्पात वापरण्यात येणारी 1110 टन गार्डर लाँचिंग मशीन भारतात तयार करण्यात आली असून ती आता परदेशात निर्यात केली जात आहे. तसेच, बुलेट ट्रेन चालवणारे लोको पायलट आणि अधिकारी जपानमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. जपानी तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित केले जात आहे.भविष्यातील 16 किलोमीटर सुरंगाचे काम टनल बोरिंग मशीन (TBM) द्वारे केले जाणार असून त्यात 13.1 मीटर व्यासाची एकल ट्यूब सुरंग असेल, ज्यात दोन ट्रॅक असतील. सुरंगाच्या आतून मंत्री आणि कामगारांनी एक walkthrough देखील केला, ज्याचे हिंदी आणि इंग्रजी व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत.ही प्रगती भारताच्या रेल्वे क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि 2 तासांत मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य होणार आहे, जे सध्या 9 तास लागतो. बुलेट ट्रेनमुळे देशातील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे, हे निश्चित.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *