बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे गैरव्यवहाराची चौकशी एस आय टी मार्फत

 बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे गैरव्यवहाराची चौकशी एस आय टी मार्फत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस हायवे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी झालेल्या गैरव्यवहार आणि तक्रारी यांच्या चौकशी साठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्य प्रश्नावर केली , मनिषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. Bullet Train and Baroda Express highway scam probed by SIT

ही चौकशी करताना संबधित आमदारांना ही बोलावले जाईल , हा चौकशी अहवाल महिनाभरात घेऊन पुढील कारवाई केली जाईल असं ही मंत्री म्हणाले.

आदिवासी जमिनींसाठी विशेष मोहीम

आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष मोहीम आखली जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याबाबतचा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. देवराव होळी , संजय केळकर , विजय वडे्टीवार आदींनी उप प्रश्न विचारले होते.

अशी मागणी होणाऱ्या जिल्ह्यात समिती गठित करून अशी प्रकरणे निकाली काढण्यात यावीत अशी सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत असं ही मंत्री म्हणाले.

ML/KA/PGB
2 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *