सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिके पाण्याखाली …

बुलडाणा दि १५ :- जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेल्या सोयाबीन, कपाशी ,उडीद, मूग पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. पावसामुळे काही शेतं जलमय झाली आहेत. जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात पळसखेड चक्का या भागातही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.
उंब्रज–देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला. तर किनगाव राजा गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.ML/ML/MS