बुलडाणा शहरावर धुक्याचं अच्छादन, वातावरणात प्रचंड गारवा….
बुलडाणा दि २८– दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी बुलढाणा शहरावर धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे वातावरणा
मध्ये गारवा निर्माण झाला होता. सर्वत्र धुक्याचं आवरण असल्यामुळे वाहनधारकांना हेडलाईट सुरू करून आपली वाहने चालवावी लागत आहेत.
रविवारी रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये सर्वत्र पाऊस झाला तर लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, या भागामध्ये गारांचा पाऊस झाला. जवळपास दोन किलोची गार या भागामध्ये पडल्यामुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर आज सकाळीच बुलडाणा शहरामध्ये सर्वत्र धुकं पसरलं होतं.
या धुक्यातून वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यासाठी हेडलाईट लावूनच आपली गाडी चालवावी लागत होती परिसरामध्ये सध्या धुके असल्यामुळे गारवा निर्माण झाला आहे. काल रात्रीही अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस झाला. आज सकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण असून अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे.