बुलडाणा जिल्ह्यात रात्री काही भागात पावसाची दमदार हजेरी…!

बुलडाणा दि २२– बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, मका यासह खरिपाची पिके करपत चालली होती शेतकऱ्यांची चिंता वाढत होती मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव,शेगाव, संग्रामपुर, तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली मात्र लोणार तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने गावे प्रभावित झाली आहेत.
लोणार तालुक्यातील टिटवी ल. पा. देऊळगाव कुंडपाळ ल.पा. प्रकल्प गुंधा ल. पा. प्रकल्प १०० % भरले आहेत. तरी नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात येत आहे. नदीकाठचे गावे-देऊळगाव कुंडपाळ , टिटवी , रायगाव, नांद्रा , गुंजखेड, मोहोतखेड या गावांनी सतर्क राहावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. खामगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मन प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन आराखड्या नुसार प्रकल्पामध्ये ८०% पाणीसाठा असणे निर्धारित आहे.
पाण्याचा येवा आणि पाऊस लक्षात घेता धरण सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळी १०:०० वा. मन प्रकल्पाचे २ द्वार ५ cm उघडून १२.०० घ.मी./सेकंद एवढा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे . तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क रहावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे धरण परिसरातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे. तरी धरणाच्या खालील नदीवरील नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, वस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. ML/ML/MS