म्हैस आणि गायीच्या दूध दरात झाली दोन रुपयांची वाढ

 म्हैस आणि गायीच्या दूध दरात झाली दोन रुपयांची वाढ

सांगली दि ५– म्हैस आणि गाईच्या दुध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सदरची वाढ तातडीने लागू करण्यात आली आहे. दूध उत्पादक व विक्रेता संघटनेने काल सांगलीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला. यापूर्वी म्हशीचे दूध दर 66 रुपये लिटर तर गाईचे दूध दर पन्नास रुपये लिटर याप्रमाणे होते. त्यात आता प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उन्हामुळे दुधाची मागणी वाढली असून उत्पादन ही नेहमीपेक्षा थोडे कमी होत आहे. चारा आणि पाणी कमतरतेमुळे दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. मलई युक्त ताक चाळीस रुपये लिटर विकले जात आहे.

ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *