बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी..

बुलडाणा दि १२– असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो.. आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बुद्ध जयंती निमित्त पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी, पुज्यनिय स्वरानंद भंतेजी व आमनेर संघ पुज्यनिय भंतेजी संतचित्ता थेरो (श्रीलंका)यांच्या हस्ते बुध्द वंदना, धम्म देशना घेऊन बुध्द जयंती साजरी करण्यात आली आहे.
यावेळी यशसिध्दी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंट च्या सैनिकांची व रमाईच्या लेकी ग्रुप पंचशिल धम्म ध्वजाला तसेच वंदनीय भिख्खु संघाला मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते..यावेळी सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुखेश झंवर, कोमल झंवर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..यावेळी प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्मातील समता, प्रेम, करुणा आणि अहिंसा या मूल्यांची माहिती दिली .
बुद्ध धम्माच्या माध्यमातून समाजात शांतता आणि सुसंवाद कसा निर्माण करता येईल यावर मार्गदर्शन केले. बुद्ध धम्माचे महत्त्व आणि त्याचे समाजाला होणारे फायदे सांगितले आहे.
ML/MS