विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले. ते पाच दिवस चालणार असून उद्या चार महिन्यांसाठी चे ले सादर होईल , पूर्ण अर्थसंकल्प येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.
आज विधासभा आणि विधानपरिषदेत पहिल्याच दिवशी वंदे मातरम आणि राज्य गीतानं कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर २०२३-२०२४ च्या ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडल्या. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं आज जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक ,
सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक ,वस्तू आणि सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक , आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक यांसारख्या विधेयकांचा समावेश आहे.
विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज प्रसाद लाड,अनिकेत तटकरे,धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून निवड केली. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि विधानसभा सदस्य आणि माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. Budget Session of Legislature begins
ML/KA/PGB
26 Feb 2024