अर्थसंकल्प म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. राज्यातील कोणाचंही समाधान न करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते, फडणवीसांनी विरोधकांना पंचामृत , शिंदे गटाला प्रसाद तर भाजपाच्या सदस्यांना महाप्रसाद वाटप याद्वारे केलं आहे असा टोला ही पवार यांनी यावेळी लगावला , विरोधकांच्या विकास कामांचा निधी थांबवून राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे असा आरोपही त्यांनी केला.Budget is the rice of speech and rice of speech
केंद्राकडून अद्यापि अठरा हजार कोटींहून अधिक रक्कम जिएसटी परताव्या पोटी राज्य सरकारला येणं बाकी आहे, केंद्राकडून येणाऱ्या सहाय्यक अनुदानात मोठी कपात करण्यात आली आहे, राजकोषीय तूट ९४ हजार कोटींवर गेली आहे, त्यात अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडल्यानंतर ती अधिकच वाढणार आहे असं अजित पवार म्हणाले.
महागाई रोखण्यासाठी कोणतेही उपाय या अर्थसंकल्पात नाहीत याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं अशी मागणी पवार यांनी केली.
ML/KA/PGB
13 Mar. 2023