भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु. विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण.

 भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु. विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण.

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत) : बजेटपूर्व आठवड्यात भारतीय बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 81,587.76 आणि निफ्टीने 24,854.80 ची विक्रमी पातळी गाठली. परंतु बाजार बंद होताना नफावसुलीमुळे (profit booking) चार दिवसांच्या रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक लागला.अर्थसंकल्पापूर्वी बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रमी वाढ झाल्याने बाजारात नफा वसुली झाली.
भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु झाले आहे.( budget countdown)
23 जुलै रोजी सकाळी 11वाजता अर्थमंत्री(Finance Minister) बजेट सादर करतील.गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष याकडे लागले आहे.खास करून कर सवलत कारण फेब्रुवारीत सादर केलेल्या बजेट मध्ये करात (Incometax) सवलत मिळावी नव्हती. त्याचप्रमाणे housing /consumption/infrastructure/construction या क्षेत्रातील कंपन्यांकडे बाजाराचे लक्ष राहील. उत्पादन शुल्कात छेडछाड केली नाही तर आयटीसी जोरदार धमाका करेल. आयटी कंपन्यांची दिशा अमेरिकेतील निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.The direction for IT companies will be clear after the US elections.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाशी (Union Budget) संबंधित किंवा सरकारी धोरणाच्या घोषणा ,तिमाही निकाल (Q1 earnings),परकीय निधीचा प्रवाह(foreign fund inflow), कच्च्या तेलाच्या किमती(crude oil prices) अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 24530.9 चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 24502.2 -24449-
24433-24414-24388-24331-24281-24240 हे महत्वाचे सपोर्ट (Support)
आहेत.हे तोडल्यास निफ्टी
24193-24141-24123-24056-23992-23985-23868-23805-23868-23754-23721-2367 23577 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24543-
24587-24619-24631-24736-24754-24880-24977-25101 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेण्याची गरज आहे.

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/ML/PGB
21 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *