बी एस एन एल पसरविणार इंटरनेटचे जाळे

 बी एस एन एल पसरविणार इंटरनेटचे जाळे

पुणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात इंटरनेटचे जाळे पसरविण्याकरता भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल ला मोठी आर्थिक ताकद दिली आहे. राज्यातही दुर्गम भागात इंटरनेट पोहचून तिथल्या ग्रामस्थांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता उद्यमी नेट,मिशन 500 असे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बीएसएनलचे राज्यातील संचालक अरविंद व़रडनेरकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.BSNL will spread internet network

राज्यात आजही फोरजी इंटरनेट सेवा काही दुर्गम भागात पोहचली नाही. याकरता राज्यातील 5200 गावात 2751 इंटरनेट टाँवर उभारण्यात आले असून याकरता राज्य सरकारने बीएसएऩलला मोफत जागा ,वीज देण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे.
तर भारत नेट या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या टप्यात 15 हजार ग्रामपंचायत पैकी 7 हजार ग्रामपंचायतीना 4 जी इंटरनेट सेवा देण्यात आली आहे.

या भारत उद्यमी या उपक्रमातून तिथल्या स्थानिक युवकांनाही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बीएसएनलला केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीसोबत त्याच्या मालमत्ता विकण्यासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात बीएसएनलने 22 मालमत्ता विक्रीस काढल्या असून यातून 10 हजार कोटीहून अधिक आर्थिक फायदा होणार आहे. मुंबई,दिल्ली मध्ये एमटीएनएल ही कंपनीही इंटरनेटसह इतर सुविधा ग्राहकांना देत आहे. पण एमटीएनएल चे लवकरच बीएसएनएल मध्ये विलीगीकरण होईल . असे अरविंद वरडनेकर यांनी सांगितले.

ML/KA/PGB
27 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *